शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातारा जिल्हा शिक्षक बँक निवडणूक: कराड-पाटण गटात तिरंगी लढतीने रंगत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:31 IST

बंडखोरीचा फटका बसणार की कोणाला झटका बसणार? याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

प्रमोद सुकरेकराड : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचीनिवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. शिक्षक संघटनांच्या नव्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. कराड -पाटण गटात तिरंगी लढत होत असल्याने ती रंगतदार होत असून येथे बंडखोरीचा फटका बसणार की कोणाला झटका बसणार? याबाबतच्या उलट सुलट चर्चा  सुरू आहेत.मुळताच कराड तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच कराड- पाटण गटात बँकेसाठी सर्वाधिक ११०० वर मतदान आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड पाटणच्या मतदारांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा या तालुक्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे निश्चित!या निवडणुकीत सत्ताधारी माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील समर्थक शिक्षक संघाने शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली सभासद विकास पॅनेल उभे केले आहे. तर शिक्षक संघाचे दुसरे नेते संभाजीराव थोरात यांच्या गटाने शिक्षक समितीला मदतीचा हात देत विरोधात सभासद परिवर्तन पॅनेल रिंगणात उतरवले आहे. शिवाय काही ठिकाणी तिसऱ्या स्वाभिमानी आघाडीचे उमेदवारही रिंगणात आहेत.कराड पाटण गटात शिक्षक संघाच्या पुस्तके गटाचे महेंद्र जानुगडे उमेदवार आहेत. तर विरोधात शिक्षक संघ थोरात गट व समितीचे संजय नांगरे हे रिंगणात आहेत. शिवाय संभाजीराव थोरात यांचे समर्थक असणाऱ्या नितीन नलवडे यांनी बंडखोरी केल्याने या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार की बंडखोर झटका देणार? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

होम पिचवरच धक्काशिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात हे मूळचे कराड तालुक्यातील आहेत. त्यांनी या निवडणुकीत समिती बरोबर युती करून लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाटाघाटीत या गटातील उमेदवारी शिक्षक समितीला गेली. पण त्यांचे कार्यकर्ते असणाऱ्या नितीन नलवडे यांनी बंडखोरी केल्याने थोरात यांना होमपिचवरच धक्का बसल्याचे बोलले जात आहे.आजवर समितीचेच वर्चस्वकराड- पाटण तालुक्यात प्रथमदर्शनी शिक्षक संघाचे प्राबल्य दिसते. शिक्षक सोसायटी निवडणुकीत अपवाद वगळता ते दिसूनही येते. मात्र शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अपवाद वगळता आजवर समितीचाच उमेदवार विजयी झाला आहे. आता त्यांना नेमकी कोणाची मदत होत राहते? हा संशोधनाचा भाग आहे. पण तीच परंपरा समिती या निवडणुकीत कायम ठेवणार का? हे पहावे लागेल.म्हणे आम्ही त्यांचेच ..बंडखोरी केलेले उमेदवार नितीन नलवडे हे आम्ही शिक्षक संघाच्या थोरात गटाचेच आहोत .मात्र आधी उमेदवारी संघाने निश्चित केली व नंतर ती समितीला दिली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे  मला माघार घेता आली नाही. मात्र आम्ही शिक्षक संघाच्या थोरात गटाचेच असल्याचे नलवडे मतदारांना सांगताना दिसतात.असे आहे मतदानकराड पाटण- गटात ११५७  शिक्षकांचे मतदान आहे. पैकी ६७९ मतदान कराड तालुक्यातील तर पाटण तालुक्यात ४७८ मतदान आहे. रिंगणात उभे असणाऱ्या तीन उमेदवारांपैकी महेंद्र जानुगडे व नितीन नलवडे हे दोन उमेदवार मुळचे पाटण तालुक्यातील आहेत. संजय नांगरे हे मूळचे कराड तालुक्यातील आहेत.सेवानिवृत्तांची मते २०० वरकराड पाटण गटात सेवानिवृत्त झालेल्या २०० वर प्राथमिक शिक्षकांची मते आहेत. ही मते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार असे मानले जाते.म्हणे सत्ता महत्त्वाची नाहीसत्तेपेक्षा संघटना महत्वाची असते. त्यामुळे  शिक्षक बँक निवडणुकीत शिक्षक संघ एकसंघ करण्याची संधी चालून आली होती. मात्र निवडणुकीनंतर संघटनेशी संबंध नसणाऱ्या लोकांमुळे ती वाया गेली आहे .पण आता कराड- पाटण  सोसायटी निवडणुकीत तरी नेत्यांनी एकसंघ होण्याबाबत विचार करावा अशा भावना शिक्षक संघाचे सामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकTeacherशिक्षकElectionनिवडणूक