शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सातारा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दमदाटी, एकावर गुन्हा : कार्यालयात घुसून केला दंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 4:35 PM

शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद तुकाराम शेलार (रा. एलआयसी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दमदाटीशाहूपुरीत एकावर गुन्हा दाखल : कार्यालयात घुसून केला दंगा

सातारा : शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद तुकाराम शेलार (रा. एलआयसी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नागरिक व खेळाडूंच्या मागणीनुसार त्यांना चालवण्यासाठी दिला जातो. मिलिंद शेलार याच्याकडे काही दिवस एक कोर्ट चालवण्यासाठी दिले होते. मात्र, काही कालावधीनंतर ते पुन्हा काढून घेण्यात आले.

सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडा अधिकारी युवराज नाईक हे आपल्या दालनात काम करीत होते. यावेळी मिलिंद शेलार हा दालनात घुसला. त्याने पूर्वी माझ्याकडून काढून घेतलेला बॅडमिंटनचा कोर्ट मला पुन्हा चालवायला द्या, मला प्रॅक्टिसकरिता बॅडमिंटन कोर्ट पाहिजे, अशी मागणी केली.त्यावर नाईक यांनी बॅडमिंटन कोर्ट रिक्त नसल्याने तो देता येत नाही. रिक्त झाल्यानंतर दिला जाईल, असे सांगितल्याच्या कारणावरून संतापलेल्या शेलार याने कार्यालयात टेबलावरील फायली फेकून दिल्या. तसेच नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली.

याप्रकरणी युवराज नाईक (रा. गुरुवार बाग, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मिलिंद शेलार याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर