सातारा : पेटत्या समईला साडी लागल्याने पुजारी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:36 IST2018-12-27T13:34:42+5:302018-12-27T13:36:55+5:30
मंदिरात पेटत्या समईला साडी लागल्याने भाजून जखमी झालेल्या काशीबाई मनोहर पुजारी (वय ७५, रा. रविवार पेठ, फलटण) या वृद्ध पुजारी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : पेटत्या समईला साडी लागल्याने पुजारी महिलेचा मृत्यू
सातारा : मंदिरात पेटत्या समईला साडी लागल्याने भाजून जखमी झालेल्या काशीबाई मनोहर पुजारी (वय ७५, रा. रविवार पेठ, फलटण) या वृद्ध पुजारी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फलटण येथील एका मंदिरामध्ये काशीबाई या पुजारी म्हणून काम करत होत्या. दि. २२ रोजी दुपारी साडेचार वाजता मंदिरातील पेटत्या समईला त्यांची साडी लागली. यावेळी साडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे त्या ३० टक्के भाजून जखमी झाल्या.
सुरूवातीला त्यांना फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.