सातारा : स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू, जिल्हा शासकीय रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:28 IST2018-09-03T12:25:46+5:302018-09-03T12:28:35+5:30

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आनंदा ज्ञानू इंगळे (वय ५०, रा. सैदापूर, सातारा) असे मृताचे नाव आहे.

Satara: Death of a patient by swine flu, at district civil hospital | सातारा : स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू, जिल्हा शासकीय रुग्णालयात

सातारा : स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू, जिल्हा शासकीय रुग्णालयात

ठळक मुद्देस्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यूजिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आनंदा ज्ञानू इंगळे (वय ५०, रा. सैदापूर, सातारा) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आनंदा इंगळे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यांना रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Satara: Death of a patient by swine flu, at district civil hospital