सातारा : करंजे येथील मरिआई मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:53 IST2018-10-09T15:47:04+5:302018-10-09T15:53:11+5:30

जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

Satara: Death due to electric shock when changing the flag of the Mariya temple at Karange | सातारा : करंजे येथील मरिआई मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

सातारा : करंजे येथील मरिआई मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

ठळक मुद्देमंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने मृत्यूयुवक फेकला जाऊन जखमी, करंजे येथील मरिआई मंदिरातील दुर्घटना

मेढा (सातारा) : जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, नवरात्रीनिमित्त करंजे येथील मरिआई मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त देवळाची साफसफाई केली जाते. मंगळवारी सकाळी मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण मंदिरावर चढले.

यावेळी मंदिरावरील झेंडा असलेला लोखंडी पाईप भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण खाली उतरवत असताना लोखंडी पाईपचा धक्का शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरील तारेला लागला. यावेळी हा पाईप धनवडे यांच्या हातात असल्याने विजेचा झटका बसून धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय करंजेकर हा फेकला जाऊन जखमी झाला.

Web Title: Satara: Death due to electric shock when changing the flag of the Mariya temple at Karange