सातारा : मुलगी झाली म्हणून पत्नीचा जाचहाट, पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:10 IST2018-12-20T12:09:22+5:302018-12-20T12:10:47+5:30

पहिली मुलगीच झाली, या कारणावरून पत्नीचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सचिन बाबूराव भिसे (वय ३०, रा. नाडे नवारस्ता, ता. पाटण) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Satara: Crime of the wife, vandalism, police station, as the girl grows | सातारा : मुलगी झाली म्हणून पत्नीचा जाचहाट, पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : मुलगी झाली म्हणून पत्नीचा जाचहाट, पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देमुलगी झाली म्हणून पत्नीचा जाचहाटशाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : पहिली मुलगीच झाली, या कारणावरून पत्नीचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सचिन बाबूराव भिसे (वय ३०, रा. नाडे नवारस्ता, ता. पाटण) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुर्गा सचिन भिसे (वय २१, रा. मंगळवार पेठ, सातारा) हिने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून पती सचिन भिसे याच्यासोबत साताऱ्यातील मंगळवार पेठेत वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी मला मुलगी झाली.

या कारणावरून पतीने जाचहाट करण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठीही वारंवार शिवीगाळ, दमदाटी असा त्रासही दिला. हा त्रास जुलै २०१६ पासून सुरू आहे. दरम्यान, दुर्गा भिसे हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन सचिन भिसेला अटक केली.

Web Title: Satara: Crime of the wife, vandalism, police station, as the girl grows