सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपात केल्याप्रकरणी गुंड दत्ता जाधववर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 12:00 IST2018-05-31T12:00:30+5:302018-05-31T12:00:30+5:30
प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपात केल्याप्रकरणी गुंड दत्ता जाधववर गुन्हा
सातारा : प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, पीडित तेरा वर्षीय मुलीच्या आईला 'तुमची मुलगी खूप आवडते, ती मला दे, मला दिली नाही तर तिला दुसऱ्या कोणाला मिळून देणार नाही, तिला बरबाद करेन,' अशी धमकी दिली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पीडित मुलगी शाळेत जात असताना कारमध्ये बसवून तिला कपडे खरेदी करायला पुणे येथे नेले.
त्याठिकाणी एका लॉजवर तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. त्यानंतर ती मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. याची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.