सातारा : जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 14:47 IST2018-06-02T14:47:12+5:302018-06-02T14:47:12+5:30

बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara: Crime against 15 accused in District Civil Hospital | सातारा : जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा

सातारा : जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा

ठळक मुद्देसातारा जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हासातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

सातारा : बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवार नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गुरुवारी सायकांळी पाच वाजता बेछूट गोळीबार केला. यात एका युवतीच्या पोटाला गोळी लागल्याने ती जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तिच्यावर २७ नंबर वॉर्ड व अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना नातेवाइकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी केली. तसेच डॉक्टरांना उपचार करण्यास परावृत्त करून जखमी युवतीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

त्यानंतर संतप्त जमावाने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णवाहिकेच्या (एमएच ११ एबी ८१६३) काचा फोडल्या. याप्रकरणी डॉ. आम्रपाली निकाळजे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार एस. ई. पवार तपास करीत आहेत.

Web Title: Satara: Crime against 15 accused in District Civil Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.