सातारा : मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे नगरसेवक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:56 IST2018-02-08T17:47:20+5:302018-02-08T17:56:33+5:30
सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सातारा : मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे नगरसेवक एकवटले
सातारा : सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी नगराध्यक्षांची सही न घेता काही मर्जीतील ठेकेदारांची बोगस बिले काढल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला होता. याला नगरविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. नगराध्यक्षांची सही घेणे कायद्याने बंधनकारक असताना मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांची सही घेतली नाही.
मुख्याधिकारी साताऱ्यात हजर झाल्यापासून आजअखेर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या सर्व बिलांचे फेर आॅडिट करावे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशीही मागणीही नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.