सातारा : एमआयडीसीतील व्यावसायिकाला कंपनी जाळण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:20 IST2018-06-05T16:20:31+5:302018-06-05T16:20:31+5:30
नवीन एमआयडीसीतील एका व्यावसायिकाला त्याची कंपनी जाळून टाकण्याची धमकी देत रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : एमआयडीसीतील व्यावसायिकाला कंपनी जाळण्याची धमकी
सातारा : नवीन एमआयडीसीतील एका व्यावसायिकाला त्याची कंपनी जाळून टाकण्याची धमकी देत रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रतीक बर्गे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांची नवीन एमआयडीसीत फिटलिंगची कंपनी आहे. या कंपनीत काम करणारा सुयोग कदम याला माणिक प्रभाकर रसाळ (रा. खोकडवाडी) व इतर चारजणांनी मारहाण केली.
त्याबाबत प्रतीक बर्गे यांनी विचारपूस केली असता सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास माणिक रसाळ व इतर चार ते पाचजणांनी रॉडने मारहाण केली. तर ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तानाजी मारुती बर्गे यांनाही मारहाण करण्यात आली.
त्यानंतर तुमची कंपनी जाळून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम तपास करीत आहे.