शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Satara Bus Accident : आंबेनळी घाटातून सर्व मृतदेह काढले बाहेर, शोधकार्य थांबवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 14:08 IST

Satara Bus Accident : पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून 30 जणांचा जागीच मृत्यू झाला.

महाबळेश्वर/पोलादपूर : पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात आल्यानंतर बचाव पथकानं शोधकार्य थांबवले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीनं शोधकार्य राबवण्यात आले.  दरम्यान, खिडकीतून बाहेर फेकले गेल्याने वाचलेल्या एकाने दरीतून वर येऊन माहिती दिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तालुक्यात राहणारे आहेत. त्या भागांत शोककळा पसरली आहे.

(Satara-Poladpur Bus Accident : बस अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो)

30 killed as vehicle plunges into 500-feet-deep gorge  

 

 

 

 

(Satara Bus Accident: बसमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती अन् होत्याचं नव्हतं झालं!)

शनिवार, रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघाले होते. विद्यापीठाचीच बस त्यांनी घेतली होती. एकूण ३२ कर्मचारी, दोन चालक, वाहक असे 34 जण सकाळी 7 वाजता निघाले. आंबेनळी घाट पायथ्याच्या धबधब्याजवळ त्यांनी बस थांबविली. तेथून ते महाबळेश्वरकडे निघाले. चालक प्रशांत भांबेड बस चालवत होता. धुके असल्यामुळे बसचा वेगही फारसा नव्हता. बसमध्ये सर्वजण हास्यविनोदात मग्न होते. चालक भांबेडही त्यात सहभागी होते. अशाच एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि तिथेच घात झाला. बस दाभिक टोकाजवळ उजव्या बाजूला आठशे फूट दरीत कोसळली. गाडीच्या काचा फुटून अनेक जण बाहेर फेकले गेले, तर काही जण बसखाली दबले गेले.कृषी विद्यापीठाचे सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर झाडांचा आधार घेत ते रस्त्यावर आले. त्यांनी मोबाइलवरून विद्यापीठात फोन करून अपघाताची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचलोदरवर्षी पावसाळी सहल काढण्यात येते. आठवडाभरापूर्वीच वर्षा सहलीचे नियोजन सुरू होते. काम असल्याने जावे की नको, या संभ्रमात मी होतो. शुक्रवारी सायंकाळीही मला मित्रांनी फोन करून येण्याचा आग्रह केला. मात्र, मी गेलो नाही. सकाळी साडेअकरा वाजता फोन आला आणि अपघाताची माहिती मिळताच मी हादरून गेलो. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मी वाचलो, असे विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक संतोष महादेव पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.जाणे टाळले, म्हणून वाचलोकृषी विद्यापीठातील आणखी एक कर्मचारी प्रवीण रणदिवे यांनी पिकनिकला जाण्याचे टाळल्याने ते या अपघातातून बचावले. रणदिवे यांनी सांगितले की, माझा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता, पण तब्येत बरी नसल्याचे कारण देत, मी पिकनिकला जायचे टाळले.मला सकाळी फोन आला, तेव्हाही मी सहकाºयांना येत नसल्याचे कळविले. पिकनिकला गेलेल्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोही पाठवले. ९ वाजेपर्यंत चॅटिंग सुरू होते. नंतर ग्रुपचा संपर्कच तुटला. दुपारी १२.३० च्या सुमारास अपघाताची बातमी कळली आणि मन सुन्न झाले, असे रणदिवे म्हणाले.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातAccidentअपघातDeathमृत्यू