सातारा : दुचाकींची समोरासमोर धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:54 IST2018-06-13T13:54:27+5:302018-06-13T13:54:27+5:30
पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघेजण ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

सातारा : दुचाकींची समोरासमोर धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे ठार
वडूज : पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघेजण ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस हवालदार अजित टकले
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खटाव येथील महादेव सुदाम वायदंडे (वय २५), यशवंत साठे व प्रतीक वायदंंडे हे मंगळवारी रात्री दुचाकीवरून ट्रीपल सीट वडूजकडे निघाले होते. त्याचवेळी दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार अजित टकले (रा. नीरा, फलटण) हे वडूजवरून पुसेगावकडे दुचाकीवरून निघाले होते.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुसेगाव मार्गावरील वाकेश्वर फाट्याजवळ येताच दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे यांचा मृत्यू झाला. दोघा जखमींवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.