सातारा : खंडणीचे प्रकरण भाजप शहराध्यक्षाला भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:52 IST2018-05-19T16:52:10+5:302018-05-19T16:52:10+5:30
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील काळेकर यांना खंडणीचे प्रकरण चांगलेच भोवले. काळेकर यांना शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

सातारा : खंडणीचे प्रकरण भाजप शहराध्यक्षाला भोवले
सातारा : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील काळेकर यांना खंडणीचे प्रकरण चांगलेच भोवले. काळेकर यांना शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
विश्रामगृहावरील एका खोलीत कोंडून त्यांच्यासह शिवसेनेचा पदाधिकारी हरिदास जगदाळे व संदीप मेळाट यांनी खंडणीसाठी एका मुख्याध्यापकाला जबर मारहाण करुन पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान, खंडणीच्या प्रकरणात काळेकर यांचे नाव आल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे.
काळेकर या आरोपातून पूर्णत: शहानिशा होऊन जोपर्यंत दोषमुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, त्यांचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात सातारा शहर सरचिटणीस विकास विजय गोसावी यांच्याकडे सोपविला आहे.