शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद, कॉँग्रेस -राष्ट्रवादीची रॅली : डाव्या पक्षांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:40 IST

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देसातारा बंदला संमिश्र प्रतिसाद, कॉँग्रेस -राष्ट्रवादीची रॅली डाव्या पक्षांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला.कॉँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळी सातारा शहरात रॅली काढली. गांधी मैदानापासून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी आवाहन करण्याआधीच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. कॉँग्रेस -राष्ट्रवादीतर्फे आयोजित केलेली रॅली पोवई

 

नाक्यावर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संपविण्यात आली.रॅलीत राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, राजेंद्र लवंगारे, शफीक शेख, नाना इंदलकर, राजू गोरे,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. रवींद्र भारती (झुटिंग), रजनी पवार, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडीक, अन्वर पाशाखान, तालुकाध्यक्ष नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, डॉ.अजय साठे, सादिक खान, अमर करंजे, मोहसीन बागवान, विक्रांत चव्हाण, गौरव इमडे, संतोष सावंत, किशोर रावखंडे आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.बसस्थानक परिसरात सकाळी प्रवाशांची रेलचेल सुरु होती. आंदोलनाचा अंदाज घेतच बसची वाहतूक सुरु होती. नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या बसच्या वाहकांनी प्रवाशांची पुण्यापर्यंत तिकिट बुकिंग केले. तिथून पुढे परिस्थिती पाहूनबस नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान, कम्युनिस्ट पक्षानेही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. रिक्षा, स्कूल बस बंद राहिल्याने विद्यार्थ्यांनी अघोषित सुटी घेतली. बंदमुळे पालकांनीही मुलांना शाळेत पाठविणे टाळले.

शहरात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी सकाळच्या वेळेत दुकाने बंद ठेवली होती; परंतु शहरात दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरातील रस्त्यांवर वाहनांचीही रेलचेल सुरुच होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस खबरदारी घेत होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFuel Hikeइंधन दरवाढSatara areaसातारा परिसरcongressकाँग्रेस