सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:54 IST2018-02-24T16:54:25+5:302018-02-24T16:54:25+5:30
सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट
सातारा : सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आनेवाडी टोलनाक्याच्या हस्तांतरावरून झालेल्या वादातून सुरुचिवर गेल्या चार महिन्यांपूर्वी दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमचश्क्री उडाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांतील सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. काहीना अटक तर काहीनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
खासदार उदयनराजे गटाचे समर्थक किशोर शिंदे, जीवन निकम, अमोल आवळे, अमर किर्दत, सनी भोसले, पंकज चव्हाण आणि विकी यादव या सातजणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर आमदार गटाचे जयेंद्र चव्हाण, अन्सार अत्तार, मुक्तार पालकर, अमोल मोहिते, मयूर बल्लाळ यांच्यासह १२ जणांचा जामीन मिळाल्यामध्ये समावेश आहे.
सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र चार्ज (गुन्हा कबुल आहे की नाही) दाखल होत नाही. तोपर्यंत या १९ जणांना सातारा शहर आणि सातारा तालुक्यात न फिरकण्याची अट न्यायालयाने घातली आहे.