शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Satara Accident: ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने तरुण जागीच ठार, एमआयडीसीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:48 IST

एक जण जखमी, अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला

सातारा : दुचाकीवरून देगाव फाट्याकडे जात असताना, पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाच्या तोंडावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात दि. २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देगाव-सातारा रस्त्यावर, परफेक्ट कंपनीसमोर झाला. अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव ओंकार जयवंत गवळी (वय २०, रा.भोसले कॉलनी, कोडोली, सातारा) आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश प्रशांत माने (वय २२, रा.कोडोली, सातारा) आणि ओंकार गवळी हे दोघे दुचाकीवरून देगाव फाट्याकडे जात होते. प्रथमेश दुचाकी चालवत होता आणि ओंकार पाठीमागे बसलेला होता. परफेक्ट कंपनीसमोर पोहोचल्यावर, पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ओंकारच्या तोंडावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेशला ट्रक काही अंतर फरपटत नेले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी ओंकारला तपासल्यानंतर मृत घोषित केले, तर प्रथमेशवर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला घरी सोडण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करत आहेत.

त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीचीओंकारची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. घरातील कर्ता मुलगा मृत्युमुखी पडल्याने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोडोली परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला शोधून त्याच्यावर योग्य कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Accident: Truck Kills Young Man; Wheel Runs Over Head

Web Summary : A speeding truck fatally struck a motorcyclist near Satara, killing 20-year-old Onkar Gawli. The truck driver fled the scene. Police are investigating.