सातारा : विवाहितेवर अत्याचार करून गर्भपात, सहाजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 13:49 IST2019-01-08T13:47:39+5:302019-01-08T13:49:07+5:30

विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सातारा) व सोनाली शिंदे (रा. गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Satara: Abortion on Married, Entrance Filed Against Suicide | सातारा : विवाहितेवर अत्याचार करून गर्भपात, सहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा : विवाहितेवर अत्याचार करून गर्भपात, सहाजणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे विवाहितेवर अत्याचार करून गर्भपातसहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा : विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सातारा) व सोनाली शिंदे (रा. गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तीस वर्षीय महिलेवर प्रशांत क्षीरसागर याने अत्याचार केला. तसेच ती पाच महिन्यांची गर्भवती असताना तिच्या गळ्यात हार घालून लग्न करण्याचे नाटक केले. राहत्या घरात पावडर व गोळ्या खाण्यास देऊन पोटातील मुलाला जीवे मारले.

अमृत क्षीरसागर, कांता क्षीरसागर, सविता क्षीरसागर यांनी शिवीगाळ करत ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. एच. पोरे करीत आहेत.

Web Title: Satara: Abortion on Married, Entrance Filed Against Suicide