सातारा :मराठी विश्वकोशाचे २० खंड एका क्लिकवर, मान्यवरांच्या उपस्थितीत वाईत अॅपचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:26 IST2018-01-12T16:02:26+5:302018-01-12T16:26:40+5:30
बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे १ ते २० खंड सर्वसामान्य वाचकांना एका क्लिकवर मोबाईल-टॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश अॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

सातारा :मराठी विश्वकोशाचे २० खंड एका क्लिकवर, मान्यवरांच्या उपस्थितीत वाईत अॅपचे लोकार्पण
वाई : बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे १ ते २० खंड सर्वसामान्य वाचकांना एका क्लिकवर मोबाईल-टॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश अॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
येथील महागणपती घाटावरील काशीविश्वेश्वर मंदिरात मराठी विश्वकोश मोबाईल अॅपचे लोकार्पण मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे सदस्य दत्तात्रय पार्टे, माधव चौंडे, मंदार जोगळेकर, मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार, सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर, सहायक संपादक सरोजकुमार मिठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे अॅप वाचकांना वापरण्यास सहज आणि सोपे असून, याद्वारे नोंदनिहाय, विषयनिहाय आणि खंडनिहाय नोंदींच्या माहितीचा शोध घेता येणार आहे. या अॅपच्या लोकार्पणानंतर हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून वाचकांना विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे.