साताऱ्यातील मर्ढेच्या संकेत शिंगटेचे युपीएससीत यश, वयाच्या २८व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:39 IST2025-04-23T16:38:48+5:302025-04-23T16:39:10+5:30
सातारा : मर्ढे, ता. सातारा येथील संकेत अरविंद शिंगटे याने २०२४ केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत ४७९ रँक मिळवत यश ...

साताऱ्यातील मर्ढेच्या संकेत शिंगटेचे युपीएससीत यश, वयाच्या २८व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात मारली बाजी
सातारा : मर्ढे, ता. सातारा येथील संकेत अरविंद शिंगटे याने २०२४ केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत ४७९ रँक मिळवत यश मिळवले आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संकेत शिंगटे याने मुंबई येथे माहिती तंत्रज्ञानमधून बी.ई. ही पदवी घेतली आहे. या क्षेत्रात दोन वर्षे क्षेत्रात नोकरी केली. यानंतर लॉकडाऊन काळात त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली व सुुरुवातीला इंटेलिजन्स ब्युरो परीक्षेत यशही मिळवले. परंतु, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे लक्ष्य समोर असल्याने पुणे आणि दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
अखेर चौथ्या प्रयत्नात वयाच्या २८व्या वर्षी संकेतने युपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्याला मिळालेल्या ४७९ रँकनुसार कस्टम किंवा आयपीएस पदी त्याची निवड होऊ शकते. त्याच्या यशाबद्दल मर्ढे पंचक्रोशीसह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
अभ्यास आणि सरावात कायम सातत्य ठेवले. संयम ठेवून परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. युपीएससीचा अभ्यासक्रम जरी विस्तृत असला तरी त्याच्या अभ्यासाचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रमालाच गुरू मानले. - संकेत शिंगटे