सैनिक स्कूलमधून चंदनाच्या झाडाची पुन्हा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 16:57 IST2022-01-11T16:57:04+5:302022-01-11T16:57:41+5:30

सातारा : येथील सैनिक स्कूलच्या आवारातून सुमारे १२ हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे चोरीस गेल्याची घटना काल, सोमवारी ...

Sandalwood tree stolen again from Sainik School | सैनिक स्कूलमधून चंदनाच्या झाडाची पुन्हा चोरी

सैनिक स्कूलमधून चंदनाच्या झाडाची पुन्हा चोरी

सातारा : येथील सैनिक स्कूलच्या आवारातून सुमारे १२ हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे चोरीस गेल्याची घटना काल, सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सैनिक स्कूलच्या आवारामध्ये शाळा प्रशासनाने काही चंदनाची झाडे लावली आहेत. ही झाडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चोरीला जात आहेत. आतापर्यंत या शाळेतून तब्बल १४ वेळा झाडे चोरीस गेली आहेत. या शाळेच्या वतीने आतापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान सोमवारी रात्री अज्ञात चोरट्याने पुन्हा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश करून चंदनाची झाडे चोरून नेली. हा प्रकार शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Sandalwood tree stolen again from Sainik School