शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ..म्हणून 'तिने' मुलीसह कृष्णा नदीत उडी मारून संपवले जीवन, तपासात उघड झाले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:31 IST

सातारा : कृष्णा नदीच्या पुलावरून जुलै महिन्यात लहान मुलीसह उडी मारून आत्महत्या करणाऱ्या संचिता अक्षय साळुंखे (वय २४, रा.राऊतवाडी, ...

सातारा : कृष्णा नदीच्या पुलावरून जुलै महिन्यात लहान मुलीसह उडी मारून आत्महत्या करणाऱ्या संचिता अक्षय साळुंखे (वय २४, रा.राऊतवाडी, ता.सातारा) या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण पोलिस तपासात उघड झाले असून, तिच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहिता संचिता साळुंखे हिने तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह २७ जुलै २०२४ रोजी वडुथ येथील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनू शिंदे यांनी केला. या तपासामध्ये त्यांना परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांकडून काही माहिती मिळाली. विवाहिता संचिता साळुंखे हिने पतीचे अन्य एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज केला, तसेच दोन वर्षांची मुलगी अक्षिता ही वारंवार रडत होती. रात्री उशिरापर्यंत जागी राहिल्याने झोप येत नव्हती, त्यामुळे तिला मानसिक त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून विवाहिता संचिता हिने आपल्या मुलीसह आरळेकडे जाणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. मुलगी अक्षिता साळुंखे हिला पाण्यात टाकून तिला जीवे मारून तिचा खून केला. त्यामुळे मयत संचिता साळुंखे हिच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फाैजदार काटकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस