शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांची सांगलीवाडीत स्वच्छता मोहीम :-पूरग्रस्त भागात मदतकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:52 PM

अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

ठळक मुद्देआरोग्य, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सहभाग

सातारा : साताºयासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे सरसावले असताना आता सातारा पालिकेने आपले पाऊल पुढे टाकले आहे. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांकडून मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अग्निशमनच्या कर्मचाºयांनीही सहभाग घेतला.

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नद्यांना आलेल्या महापुराचा सातारा जिल्ह्यातील कºहाड, पाटण तालुक्यांसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सातारा पालिकेनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांकडून मिळालेल्या वस्तू व इतर मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकूण बावीस आरोग्य कर्मचारी, दोन मुकादम, एक टीपर यांच्या मदतीने येथील घरे कचरामुक्त करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी औषधांची फवारणीही करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयाकंडूनही सांगलीवाडीत मदतकार्य करण्यात आले. 

पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी पूरग्रस्तांसाठी धान्य स्वरुपात मदत केली आहे. काही नगरसेवक पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असून, या गावांना अन्नधान्यासह आणखी कशाची गरज आहे, याची माहिती जाणून घेणार आहेत. प्रशासनासह नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केला असून, सर्व वस्तू पूरग्रस्तांपर्यंत लवकरच पोहोचविल्या जातील.- माधवी कदम, नगराध्यक्षा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका