सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांची सांगलीवाडीत स्वच्छता मोहीम :-पूरग्रस्त भागात मदतकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:52 IST2019-08-13T21:52:06+5:302019-08-13T21:52:58+5:30
अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांकडून सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सातारा : साताºयासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे सरसावले असताना आता सातारा पालिकेने आपले पाऊल पुढे टाकले आहे. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांकडून मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अग्निशमनच्या कर्मचाºयांनीही सहभाग घेतला.
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नद्यांना आलेल्या महापुराचा सातारा जिल्ह्यातील कºहाड, पाटण तालुक्यांसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सातारा पालिकेनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांकडून मिळालेल्या वस्तू व इतर मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकूण बावीस आरोग्य कर्मचारी, दोन मुकादम, एक टीपर यांच्या मदतीने येथील घरे कचरामुक्त करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी औषधांची फवारणीही करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयाकंडूनही सांगलीवाडीत मदतकार्य करण्यात आले.
पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी पूरग्रस्तांसाठी धान्य स्वरुपात मदत केली आहे. काही नगरसेवक पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असून, या गावांना अन्नधान्यासह आणखी कशाची गरज आहे, याची माहिती जाणून घेणार आहेत. प्रशासनासह नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केला असून, सर्व वस्तू पूरग्रस्तांपर्यंत लवकरच पोहोचविल्या जातील.
- माधवी कदम, नगराध्यक्षा