समीर शेख यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:58 IST2020-01-18T17:56:41+5:302020-01-18T17:58:29+5:30
शाहूपुरी परिसरात सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी मटका अड्ड्यावर धडक कारवाई करून बाराजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

समीर शेख यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई
सातारा : शाहूपुरी परिसरात सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी मटका अड्ड्यावर धडक कारवाई करून बाराजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाच ते सहा ठिकाणी मटका अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी त्यांना दुचाकीसंह मटक्याचे साहित्य सापडले. मटका अड्ड्यावर सापडलेल्या दहा ते बाराजणांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. संबंधितांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होती.