शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

समितीत सामसूम; गावांत धामधूम

By admin | Updated: July 31, 2015 21:25 IST

ग्रामपंचायत निवडणूक : सभापतीसह सदस्यांच्या गावांत अटीतटीची लढत

अरुण पवार - पाटण  -तालुक्याची विधानसभा समजल्या जाणाऱ्या पाटण पंचायत समितीच्या आवारात गेल्या आठवड्यापासून सामसूम पसरली आहे. सभापती, उपसभापतींचे कक्ष रिकामे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम व आचारसंहितेचा बडगा लागू झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, सभपातींसह इतर सदस्यांच्या गावातच अटीतटीची निवडणूक असल्याने आपले राजकीय वजन दाखविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गावात चांगलीच त्रेधातिरपीट उडताना दिसून येत आहे.पंचायत राजव्यवस्थेत ग्रामपंचायत हा महत्त्वाचा कणा समजला जातो. म्हणूनच पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असल्यामुळे पंचायत समितीकडे कोणी फिरकताना दिसून येत नाही. त्यातच सभापतींसह इतर सदस्यांच्या गावात देसाई-पाटणकर गटांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी काँटे की टक्कर सुरू आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात आवले नाव असल्यामुळे स्वत:च्या गावातच पराभव नशिबी येऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाटण पंचायत समितीत आमदार शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे प्रत्येकी आठ-आठ सदस्य आहेत. सभापती संगीता गुरव या पाटणकर गटाच्या समर्थक आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सभापती, उपसभपाती पंचायत समितीत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काहीच काम उरले नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या आवारात सध्यातरी सामसूम दिसून येत आहे. पंचायत समिती हा ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीतून केले जाते. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे लागते. त्यामुळे पाटण पंचायत समितीत पदाधिकारी व जनतेचा वावर कमी झालेला आहे.- अरविंद पाटील, गटविकास अधिकारी