शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 5:00 PM

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर २१ जणांनी अर्ज दाखल केले.

ठळक मुद्दे सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखलचौथ्या दिवशी ८७ अर्जांची विक्री; आज शेवटचा दिवस

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर २१ जणांनी अर्ज दाखल केले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कऱ्हाडचे सहकारी संस्थेचे उपनिबंधक मनोहर माळी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, नंदकुमार बटाणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार, दि. ६ रोजीपासून शुक्रवार, दि. १० रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. कारखान्याच्या संचालक मंडळात कऱ्हाड , तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली, महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती, भटक्या जाती/विमुक्त/ प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग अशा दहा गटांतून एकूण २१ सदस्य आहेत.

त्यामध्ये गुरुवारी कऱ्हाड गटातून जयवंत जगन्नाथ पाटील, जयदीप जालिंदर यादव, युवराज विठ्ठल सावंत, शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, जशराज शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी तर तळबीड गटातून संपत राघू घाडगे व हिंदुराव केसू चव्हाण यांनी अर्ज दाखल केले. कोपर्डे हवेली गटातून अर्जुन कृष्णा माने, निवास प्रतापराव चव्हाण, आनंदराव उत्तम चव्हाण यांनी अर्ज दाखल केले.

मसूर गटातून प्रल्हाद भार्गव सूर्यवंशी, साहेबराव पांडुरंग साळुंखे, मानसिंगराव वसंतराव जगदाळे, संतोष शिदोजीराव घार्गे यांनी तर वाठार किरोली गटातून शिवाजी विश्वासराव घाडगे, शिवाजी पंढरीनाथ साळुंखे, विठ्ठलराव सर्जेराव घोरपडे, दिलीप बाबासो मोरे यांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती-जमाती गटातून जयवंत संपतराव थोरात व पुरुषोत्तम शंकर बनसोडे यांनी असे एकूण २१ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार, दि. १० रोजीपर्यंत आहे. आतापर्यंत एकूण १३६ अर्जांची विक्री झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.गट सदस्य संख्या दाखल झालेले अर्ज१) कऱ्हाड गट : ३ ५२) तळबीड गट : ३ २३) उंब्रज गट : २ ०४) कोपर्डे हवेली गट : २ ३५) मसूर गट : ३ ५६) वाठार किरोली गट : ३ ४७) महिला राखीव : २ ०८) अनुसूचित जाती/जमाती : १ २९) भटक्या जाती/विमुक्त/ प्रवर्ग : १ ०१०) इतर मागास प्रवर्ग : १ ०एकूण सदस्य संख्या : २१, दाखल अर्ज २१

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसरElectionनिवडणूक