शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर धावणे बेततंय जीवावर-: चुकीच्या बाजूने धावल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:55 IST

बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या जीवावर बेतण्याचा संभव आहे.

ठळक मुद्देसाताऱ्याची धावपटूंचा जिल्हा म्हणून ओळख

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या जीवावर बेतण्याचा संभव आहे. शक्यतो मोकळ्या मैदानावर धावा अथवा रस्त्यावर धावताना पुरेशी काळजी घ्या, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळच्या वेळी धावण्याचा व्यायाम हा सर्वोत्त्कृष्ट व्यायाम समजला जातो. शहरातील प्रमुख मोठी मैदाने व्यायामासाठी येणाºया नागरिकांच्या गर्दीने फुललेली असतात. सातारा मॅरेथॉनने जिल्ह्यात धाव संस्कृती रुजवली. धावण्याच्या सरावात युवा पिढीबरोबरच मध्यमवयीन आणि ज्येष्ठांचाही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत सहभाग वाढला. शहरातील मैदाने कमी पडू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी धावपटू रस्त्यांवर धावू लागले आहेत. शहराजवळच्या निसर्गात तसेच घाटरस्त्यांवर पहाटेपासून धावपटूंची वर्दळ वाढलेली दिसते. विशेषत: शनिवार-रविवारी ही मंडळी अशा रस्त्यांवर पहाटेपासूनच सराव करताना दिसतात आणि येथे प्रथम धोक्याची घंटा वाजते.

साताºयात काही रस्त्यांवर पदपथ आहेत. परंतु व्यापाऱ्यांची अतिक्रमणे, उभ्या केलेल्या दुचाकी, उखडले गेलेले पेव्हर यामुळे या पदपथांची अवस्था बिकट आहे. लोकांना स्वत:ला धड साधं चालताही येत नाही. त्यावरून धावण्याचा सराव करणं ही लांबची गोष्ट आहे. शिवाय मुख्य रस्त्यावरही तुरळक वर्दळ असते. त्यामुळे हे धावपटू मुख्य रस्त्यावरूनच धावण्याचा सराव करताना दिसतात आणि हीच गोष्ट अपघातांना निमंत्रित करणारी आहे. गेल्या काही महिन्यांत सातारा आणि परिसरात घडणाºया घटना पहाता व्यायामपटूंच्या अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब बनली आहे.

रस्त्याने चालताना नेहमी डाव्या बाजूने चालावे, हा आपल्याला शालेय जीवनापासून माहिती असलेला सरळधोपट नियम. पुढे मोठे झाल्यावरही हाच नियम आपण अखेरपर्यंत पाळतो. परंतु याही नियमाला अपवाद आहे किंवा ही माहिती अपुºया ज्ञानावर आधारित आहे. बºयाच लोकांना हे माहितीच नसते. ज्या रस्त्याला पदपथ नाही, अशा ठिकाणी ‘डावीकडून’ नव्हे तर रस्त्याच्या उजवीकडून चालावे, असं कायदा सांगतो.

रस्त्यावरून धावताना अगर सकाळच्या मॉर्निंग वॉकवेळी आपण पुढे जात असताना पाठीमागून येणारे वाहन आपल्याला दिसत नाही. अशावेळी अजाणतेपणी झालेली छोटीशी चूकही त्या धावपटूच्या जीवावर बेतू शकते. माण तालुक्यात काही वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव करणाºया तीन मुली भरधाव ट्रकखाली चिरडल्या गेल्या होत्या. जिल्ह्यातील अशा प्रकारची ही सर्वात मोठी घटना ठरली. धावपटूंनी पुरेशी काळजी घेतली तरी अशा अप्रिय घटना टाळता येऊ शकतील.धावपटूंनी शक्यतो मोकळे मैदान, घाटमाथ्यावरील रस्ते तसेच उपनगराच्या परिसरात असलेल्या दुय्यम मार्गावर धावण्याचा सराव केला पाहिजे.

महामार्गाचा वापर टाळावापहाटेच्या वेळी रस्त्यावर पुरेसा उजेड नसतो. रस्ता मोकळा असल्याने वाहने सुसाट असतात. धावणाऱ्याच्या शर्टवर रिफ्लेक्टरची पट्टी असतेच असे नाही. त्यामुळे चालकाला रस्त्यातून धावणारी व्यक्ती चटकन दिसत नाही आणि दिसते त्यावेळी खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे धावपटूंनी सराव करताना महामार्गाचा वापर टाळावा. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे किंवा धावावे. त्यामुळे समोरून आलेले वाहन चटकन दिसते आणि स्वत:चा जीव वाचवता येऊ शकतो.

नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूचा वापर करावाशर्टावर रिफ्लेक्टरची पट्टी बसवावीडोक्यावर विजेरी असल्यास उत्तमहमरस्त्यांचा वावर टाळावाअंधारात उठून दिसतील अशा रंगांचे कपडे घालावेतखुले मैदान, औद्योगिक वसाहतीत धावणे सोयीचेकानात हेडफोन लावून महामार्गाने धावणे टाळणे आवश्यक आहे

 

मॅरेथॉनचा सराव करणाऱ्या अनेकांना आम्ही रस्त्याने धावण्याचे धडे, घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना याविषयी माहिती देत असतो. रस्त्यावरील धावण्याचे होणारे तोटे लक्षात घेऊन त्या अनुषंगानेही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन यावर सुद्धा काम करण्याचे नियोजित आहे.- डॉ. चंद्रशेखर घोरपडे, मार्गदर्शक, सातारा रनर्स फाउंडेशनउत्तम आरोग्यासाठी लोक भल्या सकाळी उठून व्यायाम करतात; पण काही जणांच्या आयुष्यात हा व्यायाम काळ बनू पाहत आहे. व्यायाम करताना होणाºया अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळत असतानाच आपला जीव सांभाळून मोकळ्या जागी व्यायाम आणि धावणं उत्तम.- महेंद्र बाचल, जागरुक नागरिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातhighwayमहामार्ग