पुसेसावळीत दरोडा टाकून दागिने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:41 IST2019-06-15T16:39:55+5:302019-06-15T16:41:23+5:30
पुसेसावळी, ता. खटाव येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून नागरिकांना धाक दाखवून लाखाचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.

पुसेसावळीत दरोडा टाकून दागिने लुटले
ठळक मुद्देपुसेसावळीत दरोडा टाकून दागिने लुटले मारहाण करत चोरट्यांनी केला घरात प्रवेश
सातारा : पुसेसावळी, ता. खटाव येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून नागरिकांना धाक दाखवून लाखाचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी, पुसेसावळी येथील शारदा माने या दाम्पत्याच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी मारहाण करत घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून शारदा माने यांच्या कानातील कर्नफुले हिसकावताना माने या जखमी झाल्या.
दहा दिवसांत पुन्हा दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पुसेसावळी येथे दरोड्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली.