कराडात डॉक्टरच्या घरावर दरोडा; चाकूचा धाक दाखवून लुटले

By प्रमोद सुकरे | Updated: July 10, 2023 11:37 IST2023-07-10T11:37:18+5:302023-07-10T11:37:30+5:30

कराड शहरात चोरी लूटमारीचे सत्र सुरूच

Robbery at doctor house in Karad; Robbed at knifepoint | कराडात डॉक्टरच्या घरावर दरोडा; चाकूचा धाक दाखवून लुटले

कराडात डॉक्टरच्या घरावर दरोडा; चाकूचा धाक दाखवून लुटले

कराड : गेल्या अनेक दिवसांपासून कराड शहरात चोरी लूटमारीचे सत्र सुरू आहे. अशात आता कराड येथील  एका डॉक्टरच्या घरावर रविवारी रात्री सात ते आठ अज्ञातांनी दरोडा टाकून सोन्या - चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कराड शहरातील बारा डबरी परिसर नावाच्या शिवारात डॉ. राजेश मारुती शिंदे राहतात. या ठिकाणी ते आपल्या घरामध्ये झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ अज्ञातांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेनमुळे बारा डबरे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Robbery at doctor house in Karad; Robbed at knifepoint