रिक्षा दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:08 IST2021-06-12T18:08:08+5:302021-06-12T18:08:49+5:30
Accident Satara : संगमनगर येथे दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जखमी झाले . संभाजी महादेव पवार (वय २०, रा. महागाव, ता. सातारा) व सोमनाथ मारुती कोळपे (वय ३९, रा. संगममाहुली ता. सातारा) असे जखमींची नावे आहेत.

रिक्षा दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जखमी
ठळक मुद्देरिक्षा दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जखमीदोन्ही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
सातारा : संगमनगर येथे दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जखमी झाले . संभाजी महादेव पवार (वय २०, रा. महागाव, ता. सातारा) व सोमनाथ मारुती कोळपे (वय ३९, रा. संगममाहुली ता. सातारा) असे जखमींची नावे आहेत.
अपघात शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान झाला. संभाजी हे दुचाकीवरून घरी जात असताना सोमनाथ हे संगममाहुलीकडे रिक्षा घेऊन जात असताना समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. दोन्ही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.