शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 05:17 IST

Farmer News : राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला

- दीपक शिंदे  सातारा : राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी ऑक्टोबरमध्ये परतताना त्याने २६ जिल्ह्यांतील आठ लाख ९५ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील काढणीला आलेली पिके धुऊन नेली. यामध्ये भात, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, उडीद, केळी आणि भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाने एका हाताने भरभरून दिले, तर दुसऱ्या हाताने सगळे हिसकावून नेले, अशी स्थिती झाली आहे.राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, आठ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर एका जिल्ह्यातच फक्त ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती चांगली होती. खरीपात सर्वाधिक उत्पादन अमरावती विभागात घेण्यात आले असून, ते ३२. ५० टक्के हेक्टरवर आहे. त्यानंतर लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि कोकण या विभागांचा क्रमांक लागतो. भात पीक वगळता ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्यांच्या क्षेत्रामध्ये १ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मूग, उडीद, रागी या कडधान्याच्या क्षेत्रामध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन यांचे क्षेत्र वाढले असून, कारळ आणि इतर गळीत क्षेत्र मात्र कमी झाले आहे. कापसाच्या क्षेत्रातदेखील तीन टक्क्यांनी घट झाली असून, उसाचे क्षेत्र तब्बल ७६ टक्क्यांनी वाढले आहे.

जिल्हानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात जिल्हे)० ते ३५ टक्के      ०२५ ते ५० टक्के     ०५० ते ७५ टक्के (१)     नंदुरबार७५ ते १०० टक्के (८)    रायगड, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.१०० टक्के पेक्षा जास्त (२५) ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र