मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:02 IST2025-01-01T12:02:06+5:302025-01-01T12:02:17+5:30

सातारा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याच्या वतीने ...

Response to gram panchayat bandh in Satara district in connection with killing of Massajog Sarpanch | मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

सातारा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याच्या वतीने २ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी सातारा जिल्ह्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना शासकीय कामांसाठी अडचण आली.

सातारा जिल्ह्यात मंगळवारी ग्रामपंचायत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ग्रामपंचायतींमधील कामे बंद होती. यामुळे लोकांचे हेलपाटे झाले. त्यातच आणखी दोन दिवस ग्रामपंचायती बंद राहण्याने कामावरही परिणाम होणार आहे, तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास मुंबईतही आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिला आहे.

Web Title: Response to gram panchayat bandh in Satara district in connection with killing of Massajog Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.