शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा आनंद, शिवरायांना अभिवादन करत उंटावरून साखर वाटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 19:03 IST

मराठा समाजीची गेल्या कित्येक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण

कराड (सातारा) : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा देत कराड येथील दत्त चौकात मराठा समाज बांधवांच्यावतीने गुरूवारी उंटावरून साखर वाटण्यात आली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करुन पुष्पहारही घालण्यात आला. यावेळी अनिल घराळ, उदय थोरात, संदीप साळुंखे, विवेक कुराडे, अभय चव्हाण, शिवाजी चव्हाण, दत्ता पाटील, मोहन कदम, हेमंत पवार, वैभव पाटील, सुरेश डुबल, अमर कदम आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजीची गेल्या कित्येक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी यासंदर्भातील कायदा मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायलयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध ठरवले आहे. राज्य सरकारला कायदा बनविण्याचा अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने हे आरक्षण लागू कायदेशीर असल्याचं म्हटलं. मात्र, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नाही, तर हे आरक्षण 12 आणि 13 टक्के असेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. मराठा समाजाने आपल्या न्याय, हक्कासाठी लढा उभारला. मराठा आरक्षणासाठी भव्य मुकमोर्चे काढले. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर आज मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने मोहर उठविल्याने मराठा समाजातील नव्या पिढीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. 

अनिल घराळकामगार नेते, स्वाभिमानी संघटना 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाSatara areaसातारा परिसर