ताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:58 IST2019-11-07T15:56:48+5:302019-11-07T15:58:44+5:30
धुळदेव हद्दीतील रावरामोशी पूल या निरा उजव्या कालव्याच्या पुलावर 'एस' आकाराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील संरक्षण लोखंडी कठडे तोडून मालवाहतूक कालव्यात गेला. यामध्ये दोघेजण अडकले आहेत. ट्रक पलटी झाला. पाण्यालाही प्रवाह असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

ताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले
वाठार निंबाळकर : धुळदेव हद्दीतील रावरामोशी पूल या निरा उजव्या कालव्याच्या पुलावर 'एस' आकाराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील संरक्षण लोखंडी कठडे तोडून मालवाहतूक कालव्यात गेला. यामध्ये दोघेजण अडकले आहेत. ट्रक पलटी झाला. पाण्यालाही प्रवाह असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
याबाबत माहिती अशी की, पुणे- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीत बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ट्रक (एपी ०२ टीबी ९९४५) वरील चालकाला पुलावरील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक पाण्यात जाऊन पालथा पडला.
यामध्ये चालक व क्लिनर अडकून पडले आहेत. कालव्यात पाणी असल्याने तसेच बारा चाकेवर आणि छत खाली अशा अवस्थेत ट्रक असल्याने गुरुवारी दुपारी बारापर्यंत दोघांना बाहेर काढले नव्हते. लोणंद येथून क्रेन मागविण्यात आली आहे. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात येणार आहे.