शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या नफ्यात विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

सातारा : सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. बँकेच्या भागभांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व ...

सातारा : सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. बँकेच्या भागभांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व कर्ज वसुली आदींमध्ये झालेली वाढ यामुळे बँकेला अहवाल वर्षात विक्रमी नफा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक आमदार शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजे म्हणाले, बँक स्थापनेपासून सतत नफ्यात आहे व ऑडिट अ वर्गात आहे. बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविला आहे. सध्या आयटीचे युग असल्याने बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या बँकेमध्ये भविष्यात अधिक प्रमाणात आधुनिकीकरणाचा वापर करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. सभासद, मतदार जागृत होत आहेत त्यामुळे चांगले बदल होत आहेत. बँक आपणास सक्षम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन होत असून सभासदांनी या सभेत अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याचा बँकेचे संचालक मंडळ जरुर विचार करील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे अपेक्षित असून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होणे आवश्यक आहे. आपली बँक राज्यातच नव्हे, तर देशातच नावलौकिक प्राप्त बँक आहे.

या सभेला संचालक दत्तात्रय ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.

बँकेला ४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा : शिवेंद्रसिंहराजे

अहवाल सालात बँकेकडे रुपये ७ हजार ६२२ कोटी २८ लाखांच्या ठेवी असून एकूण कर्ज वितरण रुपये ५ हजार २४५ कोटी १७ लाख आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १२ हजार ८६७ कोटी ४५ लाख आहे. सन २०१९-२० या सालामध्ये बँकेस करपूर्व नफा रुपये ८५ कोटी ३१ लाख झालेला असून सर्व तरतुदीनंतर रुपये ४६ कोटी निव्वळ नफा झालेला आहे.

फोटो ओळ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सभेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.