लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून, कारण अस्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:31 IST2020-01-07T11:30:18+5:302020-01-07T11:31:12+5:30

लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ एकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

The reason for the murder of one shot at Lonand is unclear | लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून, कारण अस्पष्ट 

लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून, कारण अस्पष्ट 

ठळक मुद्दे लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून, कारण अस्पष्ट मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सातारा : लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ एकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडेगावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. संबंधित व्यक्तीच्या छातीवर बंदुकीतून गोळ्या घातल्याचे दिसून येत आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून, संबंधिताचा इतर ठिकाणी खून करून या कॅनॉलशेजारी मृतदेह टाकण्यात आला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले असून, कोणी बेपत्ता आहे का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. लवकरच या खूनप्रकरणाचा आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटेल, असे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: The reason for the murder of one shot at Lonand is unclear