शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Satara: कास पठारावरील रेव्ह पार्टीत धिंगाणा, दारुची बाटली डोक्यात घालून मारहाण; पाचजणांवर गुन्हा 

By नितीन काळेल | Updated: December 12, 2024 19:40 IST

सातारा : जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठावरावरील एका हाॅटेलातील रेव्ह पार्टीत धिंगाणा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या ...

सातारा : जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठावरावरील एका हाॅटेलातील रेव्ह पार्टीत धिंगाणा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या नशेत मारहाणीचा प्रकार घडला. तसेच डोक्यात दारुची बाटलीही मारण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रतीक बापूराव दळवी (रा. जकातवाडी, ता. सातारा) याने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार श्रेयस श्रीधर भोसले (पूर्ण पत्ता नाही रा. सातारा), सोन्या जाधव, रोहन जाधव, अमर पवार (तिघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर, सातारा) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, कास पठारावरील एेकीव, ता. जावळी गावच्या हद्दीतील एका हाॅटलेमध्ये शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्याचे मित्र हे एेकीव येथील एका हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर तीन ते चार नृत्यांगना डान्स करत होत्या.यावेळी फिर्यादीचा मित्र धीरज शेळके याच्या डोक्यात एका दारुच्या नशेतील संशयिताने काही कारण नसताना मद्याची बाटली मारली. त्यामुळे फिर्यादीने त्यास का मारले असा जाब विचारला. यावरुन बाचाबाची होऊन चिडून संशयिताने हातातील दारुच्या बाटलीने फिर्यादीच्या डोकीत आणि पाठीतही मारहाण केली. त्याचबरोबर संशयितांच्या साथीदारांनीही फिर्यादी प्रतीक दळवीला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी आणि दारुच्या बाटल्यानी मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस