शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

चाळकेवाडीत दुर्मिळ गरूड...

By admin | Updated: August 9, 2015 21:04 IST

वनविभागाच्या ताब्यात : पायाच्या जखमेवर उपचार

ढेबेवाडी : चाळकेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील शिवारात अरुंद बोटांचा सर्पमार गरूड हा दुर्मिळ पक्षी ग्रामस्थांना सापडला. ग्रामस्थांनी हा पक्षी ढेबेवाडी वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याची प्रकृती तंदुरुस्त असल्याचा अहवाल दिला आहे.याबाबत ढेबेवाडी वनविभागाने दिलेली माहिती अशी की, वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चाळकेवाडी येथील शिवारात काही ग्रामस्थांना दुर्मिळ पक्षी जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी तो वनकर्मचारी बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यात दिला. वनविभागाने तातडीने त्याच्यावर उपचार केले. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. उपचारानंतर हा पक्षी तंदुरुस्त झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षीमित्र डॉ. सुधीर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पक्षी जंगलात सापडतो. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या पक्ष्याचे ‘शॉर्ट स्रेक ईगल’ असे इंग्रजी तर मराठीमध्ये त्याला अरुंद बोटांचा सर्पमार गरुड या नावाने ओळखले जाते.या गरुडाचीची उंची दीड फूट असून, रंग करडा-तपकिरी पांढरा असा आहे. डोळे पिवळ्या रंगाचे असून, त्याचे कार्यक्षेत्र सुमारे वीस किलोमीटर एवढे असते. तो घिरट्या घालून साप, सरडे, सरपटणारे प्राणी यांच्यावर उदरनिर्वाह करतो. चाळकेवाडी-कुंभारगाव परिसरात सापडलेल्या या गरुडाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांचा वावर...कुंभारगाव परिसर हा डोंगरी विभागात येतो. त्यामुळे या परिसरात झाडांचे प्रमाणही जास्त आहे. कधी-कधी या परिसरात अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, कीटकांचे ग्रामस्थांना दर्शन होते. मात्र, संबंधित प्राणी, पक्षी अथवा कीटकाबद्दल शास्त्रीय माहिती नसल्याने त्यांना त्याच्याबद्दल योग्य माहिती देता येत नाही. रंग व आकार एवढेच वर्णन ग्रामस्थांकडून केले जाते. त्यावरून तो प्राणी, पक्षी कोणता हे ओळखणे पर्यावरणप्रेमींना अवघड होते. या परिसराचा पर्यावरणप्रेमींना अभ्यास करणे गरजेचे आहे.चाळकेवाडीत आढळलेला सर्पमार गरूड हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे. भक्ष्याच्या शोधात कदाचित तो खाली आला असावा. एखाद्या फासळीत किंवा तारेमध्ये अडकून त्याच्या पायाला जखम झाली असावी. या पक्ष्यांची जपणूक होणे गरजेचे आहे. - सुधीर कुंभार, पक्षीतज्ज्ञ, कऱ्हाड