शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुण्याच्या अधिकाऱ्यावर भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:16 PM

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुण्याच्या अधिकाऱ्यावर भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हागोळीबार प्रकरण; अटक न करण्यासाठी ४० हजार घेतल्याचा ठपका

पाचवड : काही दिवसांपूर्वी वाई शहरात गोळीबार करून टोळीयुद्धाच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या भुईंज येथील संशयित तरुणावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबारात सहभाग असलेल्या संशयित तरुणास अटक न करण्यासाठी हुंबरे यांनी तरुणाकडे पैशाची मागणी केली होती. मागणी करण्यात आलेल्या पैशांची देवाण-घेवाण भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हुंबरे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सातारा व पुणे जिल्ह्यांबरोबरच राज्य पोलिस दलात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हुंबरे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असून, मागील तीन महिन्यांपासून ते रजेवर आहेत.

दरम्यान सक्तीच्या रजेवर असताना देखील वर्दी परिधान करून त्यांनी पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी करून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला भुर्इंज पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर