शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले

खटाव : राज्यात दारुबंदिची चळवळ सर्वात प्रथम यशस्वीपणे करणाऱ्या डिस्कळ गावात सध्या वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले आहेत.
अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी स्थानीक पातळीवरुन ग्रामसभेत केलेला ठराव तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी लिखीत स्वरुपात असलेल्या प्रती संबंधीत पोलीस स्टेशन तसेच वरीष्ठ जिल्हा कार्यालयाशी वारंवार कळवुनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर नुतन मुख्यमंत्र्याकडे गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व महिलांनी धाव घेउन निवेदनाव्दारे साकडे घातले आहे. २0 वर्षापुर्वी याच डिस्कळ गावाने पहिल्यांदा दारुबंदीचा निर्णय घेऊन मोठी चळवळ उभी करुन एक आदर्श निर्माण केला होता. रणरागीणी महिलां एकवटुन त्यांनी या अवैध दारु व्यवसाय बंद पाडुन तीला हद्दपार केले होते. येथील परवानाधारक धारुचे दुकान त्यावेळी बंद करण्यात आले होते. याच गावाचा आदर्श घेत जिल्यात तसेच राज्यातही अनेक गावागावातील रणरागीणी महिला वर्ग आपापल्या गावात दारुबंदी करण्यासाठी सरसावल्या.
ज्या डिस्कळ गावाने दारुबंदीची मुहुर्त मेढ रोवली त्या दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात आज दारु व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या आठ ते दहा ठिकाणी दारु विक्रीसुरु आहे.
स्थानीक पोलीस यंत्रणेमार्फत कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पोलीस महानिरीक्षक, तसेच पोलीस महासंचालक, यांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. (वार्ताहर)