शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

रामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:08 IST

तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारून साजरी केली. या उपक्रमाचे आता कौतुक होत आहे.

ठळक मुद्देचित्रे रेखाटून तरुणाईकडून धुलिवंदनचा सण साजरारामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

सातारा : तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारून साजरी केली. या उपक्रमाचे आता कौतुक होत आहे.याबाबत माहिती अशी की, अमृत एकता मंडळाचे कार्यकर्ते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी धूलिवंदनाच्या एक दिवस अगोदरच शाळेच्या भिंती स्वच्छ करून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजता शाळेच्या भिंतींचे रूप पालटायला सुरुवात झाली.

याला कारण म्हणजे अरविंद गवळी कॉलेजचे विद्यार्थी आणि गावातील तरुणांनी भिंतीवर चित्रे रेखाटली. ही चित्रे साकारताच रुक्ष भिंती जिवंत भासू लागल्या. या तरुणांचा उत्साह पाहून शिक्षक आणि ग्रामस्थांनी चहा- नाष्ट्यापासून अगदी जेवणाचीही सोय शाळेतच केली. दुपारनंतर तर जसजसे चित्रात रंग भरले जाऊ लागले, तसे शाळेच्या परिसरात चित्रे पाहायला लोकांनी गर्दी केली.या उपक्रमाची संकल्पना आणि संयोजन पुण्याच्या सांस फाउंडेशनच्या वतीने सत्यशील शिंदे यांनी केले होते. तर तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी पुणे येथील चित्रकार अनिकेत जऱ्हाड, वैभव ठाकरे उपस्थित होते.मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, श्रीकांत माने, रेखा शेलार, अर्चना कोळसुरे यांच्यासह सर्वच शिक्षकांनी चित्रांची निवड, रचना करण्याबरोबरच चित्रांमधे रंग भरून उपस्थितांचा उत्साह वाढवला.रामनगरचे सरपंच अमोल गोगावले यांनी विधायक कामांसाठी तरुणाईचा जोश आणि उत्साह वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर उपक्रमाची सांगता सातारा शिक्षक बँकेचे संचालक दत्तात्रय कोरडे यांनी आभार मानून केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSatara areaसातारा परिसरartकला