शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

रामवाडीतील घराघरात रामजन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 6:47 PM

रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वत्र सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे कोरोनाचा फटका : संचारबंदीचा आदर करून सोहळा पार

पाचगणी : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे रामनवमी उत्सवावर त्याचे विरजण पडलं होतं. त्यावर मात करीत रामवाडी ग्रामस्थांनी तोंडाला मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत घरोघरी श्रीराम प्रतिमेचं पूजन करून श्रीराम नवमी उत्सव साजरा केला.

 

रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वत्र सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.

त्या आदेशान्वये रामवाडी ग्रामस्थांनी श्रीरामजन्म नवमी उत्सव रद्द केला. सर्व समाजाने एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत प्रत्येकाने आपापल्या घरोघरी प्रतिमा पूजन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत प्रत्येक गावकºयाने स्वत:च्या घरी गुरुवारी श्री रामचंद्र्रांच्या प्रतिमेचं पूजन करून गोडधोड जेवणाचा प्रसाद करीत अनोख्या पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा केला आहे.

त्याचबरोबर कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर उत्सव कसा साजरा करावा, याचं अनोखं दर्शन घालून दिलं आहे. यातून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, हे सुद्धा या उत्सवाच्या निमित्ताने दाखवून दिले आहे.या अनोख्या उपक्रमामुळे रामजन्म उत्सव सोहळ्यात खंड न पडता अखंडपणे हा उत्सव साजरा केला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी सुद्धा राहत्या ठिकाणी प्रतिमा पूजन करून सर्वांनी सर्वत्र एकाच वेळेस १२:२० ला प्रतिमा पूजन करीत रामजन्म उत्सव अशाही पद्धतीने साजरा करू शकतो. याच उत्तम उदाहरण सर्वांच्या समोर ठेवलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, ग्रामस्थांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले होते. प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपण्याकरिता घरीच प्रतिमा पूजन करावे. त्यातून एक सण-उत्सव साजरा करण्यातून सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब होईल. त्यातून कोरोना संसर्गाला हरविण्याचे बळ मिळेल.- गणेश पाडळे, सरपंच रामवाडी. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRam Mandirराम मंदिर