शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Raju Shetty: शरद पवार उसावर प्रक्रिया करणाऱ्यांनाच डोळ्यासमोर ठेवतात, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:57 IST

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही.

कऱ्हाड : ‘किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता; मात्र एकत्र येऊनही हे लोक सुधारत नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडलो आहे. शरद पवार तर ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र गुड्डीनवार, कऱ्हाड दक्षिण स्वाभिमानीचे अध्यक्ष देवानंद पाटील, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे यांची उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ एप्रिलपासून देवराष्ट्रेपासून राज्यात बळीराजा हुंकार यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांचे प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन ऐरणीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक गावांमधील ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे. शेतमालाला हमीभाव केंद्राने मंजूर करावा अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत.’

‘निसर्गातील सहा घटकांपासून वीज तयार होते; मात्र विजेचे वाटप करताना शेतकऱ्यांना आठ तास आणि इतरांना चोवीस तास हे गणित चुकीचे आहे. शेतकऱ्यांशी सरकार क्रुरतेने वागत आहे. म्हणूनच याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी ग्रामसभेमधील ठराव आम्हाला फायदेशीर ठरतील. गेल्या पाच वर्षांत सर्पदंशाने, जंगली श्वापदांच्या हल्ल्याने, वीज स्पर्शाने मृत्यू किती झाले आहेत याची माहिती सध्या संकलित करीत आहे. या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी करणार आहोत,’ असेही शेट्टी म्हणाले.एफआरपीशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात राज्य सरकारला बदल करण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार