शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले, राज ठाकरेंची कोपरखळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:22 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे लांबणीवर पडलेल्या मोदी चित्रपटाचीही खिल्ली उडवली

सातारा - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सातारा येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे लांबणीवर पडलेल्या मोदी चित्रपटाचीही खिल्ली उडवली. ''निवडणूक आयुक्तांनी आदेश दिल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन टाळले म्हणे. खरंतर हा चित्रपट पाहायला कुणीच आले नसते. म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले.''असे राज ठाकरे म्हणाले. ''मोदींची एकंदरीत धोरणे हिटलरशी मिळतीजुळती आहेत. हिटलरप्रमाणे मोदींही आपला अजेंडा राबवणारे चित्रपट आणत आहेत. आता त्या मोदी चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक आयुक्तांनी सांगितल्यामुळे पुढे ढकलले. तेही यांचेच. खरंतर हा चित्रपट बघायला कुणी आले नसते. त्यामुळेच या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले. बरं एकतर मोदी आणि त्यात मुख्य अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणजे आनंदीआनंदच.'' असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.यावेळी पुलवामातील हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी मोदींवर तोफ डागली. यावेळी त्यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं भाषण स्क्रीनवर दाखवलं. 'सीआरपीएफ, लष्कर, पोलीस सर्वकाही सरकारच्या ताब्यात असताना दहशतवादी सीमा ओलांडतात कसे? त्यांना पैसा येतो कुठून? सर्व यंत्रणा तुमच्या हातात असताना हे सगळं कसं काय होतं?' असे सवाल मोदींनी मुख्यमंत्री असताना उपस्थित केले होते. मोदींचा तोच व्हिडीओ दाखवत आता मोदींनी याच प्रश्नांची उत्तरं देशाला द्यावीत, असं राज ठाकरे म्हणाले.  एअर स्ट्राइकवरुन मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकवल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आम्हाला पुन्हा मोदीच पंतप्रधानपदी हवा, असं कसं काय म्हणतो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदींच्या सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा म्हणणारे, त्यांनी एक मारला तर त्यांचे चार मारा म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला कसे बोलावतात? वाट वाकडी करुन अचानक शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवायला कसे काय जातात? त्यांच्याकडे बिर्याणी कशी खातात? असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी हे सर्व करत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीsatara-pcसाताराMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक