कोयना धरणात ९६.५० टीएमसी साठा -पातळी वेगाने कमी : नवजा, महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:42 IST2018-10-03T13:40:17+5:302018-10-03T13:42:35+5:30
गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे.

कोयना धरणात ९६.५० टीएमसी साठा -पातळी वेगाने कमी : नवजा, महाबळेश्वरलाही पावसाची उघडीप कायम
सातारा : गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे.
आॅगस्ट महिन्यातच कोयना धरण भरले होते. सतत पाऊस असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून पावसाचा जोर कमी झाला तर मध्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. गेल्या पंधरा दिवसात फक्त एकदाच कोयनानगर येथे पावसाने हजेरी लावली. त्यावेळी अवघा ३५ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी कोयना धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आले. १०४ टीएमसीच्या वर भरलेल्या धरणात सध्या ९६.६५ टीएमसी साठा आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे काहीही पाऊस झाला नाही. तर आतापर्यंत ५४१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.