'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:39 IST2022-07-26T14:38:58+5:302022-07-26T14:39:40+5:30
कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला

'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध
Rahul Gandhi Arrested (कराड) - प्रमोद सुकरे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ येथे युवक काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कराड काँग्रेसच्या वतीने आज सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू केल्याबद्दलही निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा संपत असतानाच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना अटक केल्याची माहिती मिळाली. सोनिया यांच्या चौकशीच्या निषेधार्थ धरणे आंदोलनात राहुल गांधी सहभागी होते. त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळत या घटनेचा निषेध केला.
कराडच्या शाहू चौकात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. 'काँग्रेसचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्यास देश पेटून उठेल व हे कदापि सहन केले जाणार नाही', असा इशारा प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी यावेळी बोलताना दिला.