शरद पवारांच्या समर्थनार्थ रहिमतपूर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:18 IST2019-09-25T15:11:37+5:302019-09-25T15:18:01+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावतीने देण्यात आले.

शरद पवारांच्या समर्थनार्थ रहिमतपूर बंद
रहिमतपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावतीने देण्यात आले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर रहिमतपूरमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. मंगळवारी रात्री विविध समाजमाध्यमातून बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता बुधवारी सामान्य रहिमतपूरकरांनी बंद पाळून आपले समर्थन पवार यांना दर्शविले. निवेदन देताना नगरसेवक विद्याधर बाजारे, शिवराज माने, अविनाश माने, विक्रम माने, नंदकुमार माने-पाटील आदी उपस्थित होते.