विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ; रहिमतपूर परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:03 IST2020-04-29T16:02:07+5:302020-04-29T16:03:31+5:30
दुपारी दीडच्या सुमारास वाराही वाहू लागला आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसास सुरुवात झाली.

विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ; रहिमतपूर परिसराला पावसाने झोडपले
रहिमतपूर : वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला झोडपून काढले.
रहिमतपूर परिसरात बुधवारी सकाळ नऊ वाजल्यापासून नागरिकांना उकाड्याने हैराण केले होते. वाढत्या तापमानामुळे घरात बसलेल्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारी बारा वाजल्यापासून वातावरण बदलू लागले. आकाशात ढगांची गर्दी जमू लागली.
दुपारी दीडच्या सुमारास वाराही वाहू लागला आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसास सुरुवात झाली. रहिमतपूरसह साप, न्हावी बुद्र्रुक, पिंपरी, वेळू, अपशिंगे, अंभेरी, वेलंग, कण्हेरखेड, सायगाव, धामणेर, जिहे, कठापूर आदी गावांना पावसाने सुमारे अर्धा तास झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेती कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची दैना उडाली.