बोगस नळ कनेक्शनचा पर्दाफाश, सातारा पालिकेने २६५ जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस
By सचिन काकडे | Updated: March 19, 2024 18:42 IST2024-03-19T18:41:04+5:302024-03-19T18:42:42+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील २६५ बोगस नळ कनेक्शनचा पर्दाफाश केला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक ...

बोगस नळ कनेक्शनचा पर्दाफाश, सातारा पालिकेने २६५ जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस
सातारा : सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील २६५ बोगस नळ कनेक्शनचा पर्दाफाश केला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, दंड भरून नळकनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, सातारावासीयांना पाणीटंचाईबरोबरच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. दैनंदिन पाणीपुरवठ्यात कोणताही बदल न करता नागरिकांकडून पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ‘पाणी नेमकं मुरतंय कुठं’ याचा पाणीपुरवठा विभागाच्या पथकाकडून शोध घेण्यात आला.
या मोहिमेत शहरातील नळकनेक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोंगरी भाग तसेच काही पेठांमध्ये तब्बल २६५ बोगस नळकनेक्शन आढळून आले. पालिकेने अशा नळधारकांची यादी तयार केली असून, संबंधितांना दंडाची नोटीसही बजावली आहे. दंड व निर्धारित शुल्क भरून नळकनेक्शन नियमित करण्याचे आदेश देण्यात आले असून, असे न केल्यास संबंधित नळधारकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.