पुणे-मुंबईकरही घेणार हातीपाटी अन् खोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:12 PM2019-04-30T23:12:09+5:302019-04-30T23:12:15+5:30

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ ...

Pune-Mumbaikar will also take part in the Hathipati and Khara | पुणे-मुंबईकरही घेणार हातीपाटी अन् खोरे

पुणे-मुंबईकरही घेणार हातीपाटी अन् खोरे

googlenewsNext

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ मे रोजी जिल्ह्यातील चार गावांत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आॅनलाईन नोंदणी केलेले पुणे, मुंबई, साताऱ्यासह इतर शहरातील नागरिक हातात पाटी, खोरे अन् टिकाव घेणार आहेत. यामुळे ही चळवळ आणखी गतिमान होईल.
गेल्या चार वर्षांपासून राज्यात अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. पहिल्या वर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राज्यातील सातारा, बीड आणि अमरावती हे तीनच जिल्हे स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. तर तिसºया स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी आणि भांडवली गावाने राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेला.
वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू झाला आहे. हे काम ४५ दिवस म्हणजे दि. २२ मेपर्यंत चालणार आहे. यावर्षीही सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव हे तीन तालुके सहभागी झालेत. माण आणि खटावमधील प्रत्येकी ६७ आणि कोरेगावमधील ६४ अशा मिळून १९८ गावांत जलसंधारणाचे काम सुरू झालंय. या गावांतील ग्रामस्थ दररोज सकाळी शिवारात जाऊन जलसंधारणाची कामे करत आहेत. कोणी टिकाव घेऊन खोदकाम करतंय. तर कोणी खोरे घेऊन पाट्या भरून देत आहे. यामुळे जलसंधारणाचे काम करण्यासाठी सर्वचजण आपापल्या परीने हातभार लावत आहेत. असे असतानाच आता १ मे रोजी जिल्ह्यात चार ठिकाणी महाश्रमदान होत आहे.
कोरेगाव तालुक्यातील सोळशी आणि चिलेवाडी तसेच माणमधील शिंदी बुद्रुक व खटावमधील वरुडमध्ये हे महाश्रमदान होत आहे. या महाश्रमदानात पुणे, मुंबई, सातारा तसेच इतर शहरातील नागरिक येणार आहेत. या नागरिकांनी पाणी फाउंडेशनच्या ‘जलमित्र व्हा’ या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली होती. संबंधितांनी कोणत्या तालुक्यात जायचे आहे, हे नोंद केले आहे. त्यावरून त्यांना माहिती देण्यात
आली.

Web Title: Pune-Mumbaikar will also take part in the Hathipati and Khara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.